STORYMIRROR

UMA PATIL

Others

3  

UMA PATIL

Others

ना कधी

ना कधी

1 min
359

जिंकले नेहमी हारले ना कधी

मन तरी का सुखी जाहले ना कधी?


राजसा जाणतो सर्व हृदयातले

मी मनाचे जरी बोलले ना कधी


बेगडी या जगाला जसे जाणले

मोहमायेस मग भाळले ना कधी


जीवनी ह्या बहरते नव्याने सदा

काळजीने मला घेरले ना कधी


दुःख मी जास्त कवटाळले ना कधी

व्यर्थ त्याला उरी पोसले ना कधी


Rate this content
Log in