मृद्गंध
मृद्गंध
1 min
215
क काळ्या मेघांचे येणे
ख खुश करती धरेला
ग गडगडाट करुन वर्दी
घ घसरवती खाली सरीला...१
ड-(स्वर) आल्या सरी मोक्तीकमाळा
च चमकती वृक्षवेली सोनेरी
छ छान मृद्गंध सुटतो
ज जपणूक चराचराची रुपेरी...२
झ झोकून पहावे वळचणीला
त्र (स्वर) ओली झाली सृष्टी
ट टवटवीत निसर्ग चोहीकडे
. ठ ठुमकत होती वृष्टी...३
ड डवरून आली पानेफुलें
ढ ढगांची सुरु पळापळ
ण(स्वर) अंगी आले चैतन्य
. त तृषा तृप्ती सकळ...४
थ थांबला ग्रिष्माचा कहर
द दव थेंब पानोपानी
ध धुक्याचे पालटले रूप
न नव सृजनाची मनमोहिनी...५