मोर
मोर
1 min
11.3K
राष्ट्रीय पक्षी आहेस तू,
मोरा तुझा वेगळाच थाट,
पिसारा फुलवून मिरवतोस तू,
थुई थुई नाचे अंगणात
कृष्णाच्या मुकुटात,
तुझे पीस फुले,
बासरीच्या तालावर,
गोपिका डुले
तुला पाहून आनंदे,
हिरवेगार रान,
पिसारा फुलवून तू,
नाच रे छान
किती ते रंग,
देवाने दिले तुला,
कार्तिक स्वामी सरस्वतीचे वाहन म्हणून,
मान हार्दिक खरा तुला