मोल पाण्याचे
मोल पाण्याचे
1 min
27K
जाणून घ्या हो तुम्ही मोल पाण्याचे,
वेध बिकट होतील,
तुमच्या आमच्या येणाऱ्या भविष्याचे ।।धृ।।
शालू पांघरून हिरवळ दिसली,
पावसाळा अन फक्त हिवाळा,
उन्हाळा येता भुई सपाटताच,
जाणून घ्या हो तुम्ही.....।।१।।
नदी-नाले गेले समुद्राला,
पडले कोरडे घसे,
निकृष्ट बांध फुटताच,
जाणून घ्या हो तुम्ही.......।।२।।
बिसलरी-शितपेय पेता,
तहान काहीकेल्या जायेना,
माटातल्या पाण्याने तृष्णा भागताच,
जाणून घ्या हो तुम्ही.......।।३।।
तुडविला तो संसार माझा,
तुडविला तो संसार तुझा,
नळावरील पाण्यासाठी अंगार खेळता,
त्यावरुन तरी जाणून घ्या,
जगन्यास तडफडणाऱ्या जीवनातील मोल पाण्याचे....।।४।।
