मोगरा फुलला
मोगरा फुलला
1 min
288
बिलगले जेव्हा त्यास
टपोरे थेंब मोतीयाचे
न खुलली कळी
पाहूनी बरसणे थेंबांचे..
वारा थंड हलकासा
स्पर्शूनी जवळूनी गेला
का बरे खुलेना
हा मोगरा रुसलेला..
थांबला पाऊसही बरसूनी
ऊन पसरले धरतीवरी
सप्तरंग आकाशी रंगले
मोहक इंद्रधनू प्रकटले..
पाहूनी इंद्रधनू आकाशी
खुलली कळी मोगऱ्याची
फुलूनी आनंदाने तयाने
सुगंधित वातावरण केले..
रूप फुलाचे घेतले
छोट्याश्या कळीने जेव्हा
शुभ्र त्याच्या सौंदर्याने
मनास मोहविले सर्वांच्या
उमलला फुलला तो
तयाचा सुगंध पसरला
शुभ्र रंग चोहोबाजुंसी
आज मोगरा फुलला..
