STORYMIRROR

vaishali vartak

Others

2  

vaishali vartak

Others

मनोबळ

मनोबळ

1 min
43

ठेवा मनात विश्वास 

होण्यासाठी स्वप्नपूर्ती

नका ढळू द्यावा तया

मिळे मग यश किर्ती


चाला दृढ विश्वासाने

नको मनी किंतु कदा

यश मिळणार नक्की 

दूर  संशय सर्वदा


दूर होईल संकट

जरी काळ खडतर

वाट असेल बिकट

 जिंकू आत्म बळावर


असे भरती ओहोटी 

समुद्रास पहा सदा

रममाण विश्वासात

 कधी न होई कष्टी कदा


जीवनात मनोबळ

हेच असे मोठे बळ

हेच असे उचित प्रांजल

सदा मिळवा आत्मबळ


Rate this content
Log in