मनो न मनी
मनो न मनी
1 min
128
गोडाचा भात
किडले दात
खूप चांगला
वरण भात
टिव्ही ची आस
नकोच ध्यास
त्यापेक्षा करू
मस्त अभ्यास
मदत करू
निश्चय धरू
स्वतःचे काम
स्वतःच करू
नम्रता लेऊ
शिकून घेऊ
वाईट गोष्टी
त्यागून देऊ
सारेच म्हणी
आहे मी गुणी
आई खुलेल
मनो न मनी