मन
मन
1 min
2.5K
माझं मन जेव्हा
ओंकार नादात
तल्लीन होतं तेव्हा
नादब्रम्हात सामावतं
माझं मन जेव्हा
निसर्गात हरवतं
हिरवाईत रमतं तेव्हा
विशाल होत जातं
माझं मन जेव्हा
सागर किनारी
लाटांचं नर्तन पाहतं तेव्हा
अथांगतेचा शोध घेतं
माझं मन जेव्हा
विमानप्रवास करतं
स्वर्गसुखाने हरखतं तेव्हा
ढगांवर तरंगतं
माझं मन जेव्हा
मृत्युला पाहतं
जन्म नश्वरतेला मानतं तेव्हा
दुःखापलिकडे जातं.
