माय तुझी
माय तुझी
1 min
2.9K
मायाममतेचा मार्ग
जागरणांनी काढला
त्या दुखण्या खुपण्याला
वात्सल्याने गोंजारिला
माय तुझी मी जाणते
तुझ्या मनीच्या भावना
शाळेत तुज धाडाया
लांब लांब मी चालले
दप्तर अन् हाताला
पकडूनी मी चालले
परि तुवा ना सोडीले
शाळेला पोहचविले
शिक्षणाने मोठा झाला
साहेब होऊनी आला
परदेशी स्थिर झाला
आईबाबा विसरला
कळ हृदयी उठली
परि तुवा न कळली
मातृप्रेमाची सावली
जगी ना ती मावली
आम्हा एकले सोडूनी
संसारात तू रंगला
वृद्धाश्रमात टाकुनी
धर्म तुझा तू जाणिला
