मन उडू उडू झालं
मन उडू उडू झालं
1 min
64
किती साधे कारण ते
ऊडु ऊडु झाल मन
ठरविलेली कामे झाली
आनंदाने उजळले क्षण
होते असे कधीतरी
मना मिळते समाधान
होता खूष मन त्याक्षणी
वाटे देवाने दिले वरदान
दिले कौटुंबिक सुख देवाने
मार्गी लागली मुले जीवनी
कर्तृत्वाने नाव उजळले त्यांनी
समाधान लाभले मनोमनी
दिले देवाने सुदृढ शरीर
काय अजून हवे मनाला
मन उडू उडू झालं
यश मिळता मोद जीवाला
काळ निवृत्तीचा जातोय
हवे ते छंद जोपासण्यात
मिळालीय संस्काराची पूंजी
मन उडु उडू झालंं आनंदात
