मन गुंतले
मन गुंतले
1 min
391
बासूरीचा मंजुळ स्वर
कानी पडताच मी भुलले
मलाच न कळले कान्हा
माझे मन तुझ्यात गुंतले.
मन तुझ्यात गुंतले
केव्हां? कसे? ना कळले
पण साजणा तू मात्र ते
बरोबर ओळखले.
पाहता क्षणी तुला
मन तुझ्यात गुंतले
सांगू कसे? कुणाला?
मजला ते न कळले.
जा जा म्हणतात सारे
पाय माझे अडखळले
जाऊ मी कशी आता
मन तुझ्यात गुंतले.
