मला दे ना...!
मला दे ना...!
सुर्य दररोज ईतका प्रकाश देतो,
पौर्णिमेलाच चंद्र तेजस्वी होतो,
तरी सुध्दा हा आकाश काळा दिसतो ना,
निर्सगा याचे उत्तर मला दे ना...!
सुर्याभोवती अनेक ग्रह घिरक्या मारतात,
आकाशगंगेत अनेक सुर्यमाला भरकटतात,
तरी सुध्दा पृथ्वीवरतीच जीवन का ?
निर्सगा याचे उत्तर मला दे ना...!
प्रत्येक प्राणी ह्या भुभागावरती वास करतो,
येथील वातावरणाचा तो महत्त्वाचा भाग होतो,
तरी सुध्दा मानवच इतका विकसीत का?
निर्सगा याचे उत्तर मला दे ना...!
ससा व कासवाची शर्यत तेव्हा लागते,
त्यामध्येही सावकाशपणे कासवाचं जिंकते,
तरी सुध्दा त्या प्रकाशाचा वेग जास्त का?
निर्सगा याचे उत्तर मला दे ना...!
पृथ्वीवरचा स्वर्ग सहा ऋतूंमध्ये हरवतो,
फक्त पावसाळ्यातच हा निर्सग बहरतो,
तरी सुध्दा पृथ्वीवरती सातच आश्चर्य का?
निर्सगा याचे उत्तर मला ते ना...!
ह्या भाषेमध्ये करोडो शब्द मला सापडले,
परंतु एकाच वाक्यास संपुर्ण साहित्य लपले,
अरे इतकी ह्या साहित्याची महती का?
निर्सगा याचे उत्तर मला दे ना...!
अनेक समस्यांचे अनेक उत्तरे मिळतात,
उत्तर मिळाले की प्रश्नच हरवतात,
प्रश्न व उत्तरे आमच्यासोबत खेळतात का?
अरे निर्सगा आता तरी याचे उत्तर मला दे ना...!
