STORYMIRROR

Pakija Attar

Others

3  

Pakija Attar

Others

मज्जा

मज्जा

1 min
355

सुट्टीच्या दिवसात करायची मज्जा

मामाच्या गावाला जायचंय आता


मामाच्या गावाला म्हशी आहे खूप

ओढ्यात नेऊनी धुऊ गुपचूप


ओढ्यात डुबकी सारखी मारू

म्हशींना रानात चारा चारू


ओढ्याच्या कडेने शिंदोळा वेचू

पळा सगळे डंक मारेल विंचू


आजीच्या हातचे मुटके खाऊ

वडाच्या पारंब्या झोके घेऊ


झाडाला कैर्‍या चढू भरभर

कैऱ्या पाडून खाऊ करकर


साहित्याला गुण द्या
लॉग इन