मी सबला नारी
मी सबला नारी
कुणाची बिशाद मला अबला समजायची
मी आहे सबला नारी ह्या भारत देशाची
विरांगणांचे रक्त सळसळते माझ्या नसात
नाही होणार मी शिकार ह्या विकृत लोकांची.
स्त्री म्हणून समजू नका दुर्बल दीनवाणी
दाखवेन मी इंगा मग कळेल माझी हिंमत.
नवदुर्गेची नऊ रुपे आवतरली आहेत
नराधमांनो वेळीच जाणा माझी किंमत.
सावित्रीची लेक मी झाले शिक्षित पंडित
खांद्याला खांदा लावून काम करते जगात
घर संसार नाती गोती सांभाळुन, ऑफिस
कामे चोख करून पैसे आणते मी घरात.
माहेर सासर दोन्ही घरचा एकोपा मी ठेवते
वेळ प्रसंगी आईबाबांचा मुलगा मीच बनते
मी आहे सबला म्हणूनच सडेतोड उत्तर देते
कष्टदायक रिती परंपरा मी धाब्यावर बसवते.
वीर रणांगिणीची उर्जा सामवाली माझ्यात
अत्याचारांचा विरोध कराया आहे मी तयार
शील चारित्र्यावर शिंतोडे उडत असेल तर
स्वसंरक्षणात उपसेन मी मर्दानिची तलवार
