मी माणूस आहे
मी माणूस आहे
1 min
228
मी माणूस आहे खेड्यातला एक
म्हणणारे खुशाल म्हणोत
मजला वेड्यातला एक
शेतात रोज जातो
मोकळ्या वाऱ्यासवे गातो
राजा सर्जाशी बोलतो
नाही मनात कुठली मेख ||१||
मी माणूस आहे खेड्यातला एक.......
खळाळता नाद हा ओढ्याचा
तो सूर्योदय पहा पूर्वेचा
किलबिलाट मधुर पक्ष्यांचा
खेड्यातले हे जगणे किती सुरेख ||२||
मी माणूस आहे खेड्यातला एक........
महाराष्ट्र रांगडा माझा
राहतो खेड्यात माझा देश
बावळा दिसे जरी वेश
वागणे माझे असे नेक ||३||
मी माणूस आहे खेड्यातला एक ......
म्हणणारे खुशाल म्हणोत
मजला वेड्यातला एक.......
