STORYMIRROR

Janhavi kumbharkar

Others

4  

Janhavi kumbharkar

Others

मी लहान असताना

मी लहान असताना

1 min
502

आता भरपूर वेळ आहे बालपणात रमायला 

रम्य त्या आठवणी पुन्हा एकदा जगायला. 


सगळंच किती छान होत मी लहान असताना 

खूप मैत्रिणी खूप मज्जा दिवसभर खेळतांना. 


घरात कमी मैदानात जास्त अशी आमची गत होती 

जेवणा आणि झोपण्यासाठी घराची तेवढी गरज होती. 


पतंग, भवरा, लगोरी, विटीदांडू सारेच आम्ही खेळायचो 

दमून भागून दिवसभर रात्री लवकर निजायचो. 


सुट्टीत घरी बसलेलं मला काही आठवत नाही 

भातुकलीच्या खेळातील भांडण काही सुटत नाही. 


शाळेमधल्या बाकांवरती खूप मन रमायचं 

सर्व स्पर्धा, नृत्य, नाट्य तेव्हा सर्व जमायचं. 


आता मनाचे फुलपाखरू पुन्हा अलगद उडू लागले 

पुन्हा पुन्हा शाळेमधल्या बाकांवरती बसू लागले. 


किती मोठा खजिना होता मित्र मैत्रिणींचा 

सारंच कस सोपं होत बालपणी आमच्या. 


काळजी, चिंता, बजेट, पैसा काहीच आमच्या कक्षेत नव्हतं 

मजा, मस्ती, अभ्यास, धमाल एवढच काय ते माहित होत. 


आता सारंच बदललंय वेळ मिळत नाही 

पूर्वी सारखे मित्र -मैत्रिणी आज भेटत नाही. 


असं वाटत पुन्हा एकदा लहानगे व्हावे 

तरुणपणाच्या वाटेवरती बालपण जपावे. 


Rate this content
Log in