STORYMIRROR

Manik Nagave

Others

4  

Manik Nagave

Others

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

1 min
201

 सह्याद्रीच्या कडेकपारीतून

 नाद गर्जतो , दुमदुमतो .

 बोला जय महाराष्ट्र जय ,

 घोष कानी हा घुमतो .


 मराठमोळी भाषा सुंदर ,

 लावण्य तीचे हे बहुमोल .

 लावणीचा ठसका भारी ,

 जरीपटका शिरी अनमोल .


 शाहू राजा थोर राजा ,

 शोभला रयतेचा वाली .

 छत्रपती शिवरायांनी याला ,

 केला रयतेच्या हवाली .


 संस्काराचे बीज रुजते ,

 नसानसातून इथे वाहते .

 संस्कृतीही फुलत जाते ,

 लहानथोरांमध्ये ही वसते .


 महाराष्ट्र माझा , बोल अधरी ,

 सतत गाती स्तूतीसुमने .

 थकती न कधी , कोणी येथे ,

 गाया तव थोर कवने .


Rate this content
Log in