महाराज तुम्ही परत या
महाराज तुम्ही परत या
भरकटलेल्या विचारांना,
निश्चयाचा ध्यास द्या.
हरवलेल्या विश्वासाला,
जिंकण्याचा श्वास द्या.
समाजाला समतेचा संदेश द्या ह्या.
महाराज तुम्ही परत या.
मनातून दुभागलेल्या,
जातीत विभागलेल्या.
झेंडा घेऊन हतात,
नुसताच चाललेल्या.
विसकटलेल्या भावनांना,
एकतेचा संदेश द्या.
महाराज तुम्ही परत या.
भगव्याची भक्ती नाही,
फक्त आपलाच स्वार्थ पाही.
गट गटाची राजनिती,
येथे हर एक करू पाही.
चिरा पडलेल्या या स्वार्थी,
मनाना एकतेचा मुलामा द्या.
महाराज तुम्ही परत या.
मावळे होण्याच्या आवेशात,
फक्त दाड्या, मिश्या वाढवून.
जल्लोष करायचा जंयतीला,
ढोल ताशे बडवून.
मावळ्यांची एकनिष्ठा वाढेल,
का कधी लोकात ह्या.
महाराज तुम्ही परत या.
आपला मराठा मावळा,
हरवला आहे न जाने कोठे.
माणसा माणसातला माणूस,
हरवला आहे न जाने कोठे.
माणसाला माणसाची जाणिव,
पुन्हा एकदा करून द्या.
महाराज तुम्ही परत या.
महाराज तुम्ही जो मावळा घडवला,
तो न जाने कोठे हरवला.
आज तुमच्या नावा खाली,
फक्त मुद्यांचाच वाद चालवला.
एकतेच्या शक्तीची महती पुन्हा एकदा सांगायला या.
महाराज तुम्ही परत या.
महाराज तुम्ही परत या,
धेय नवे अम्हास द्यायला.
महाराज तुम्ही परत या,
जिद्द नवी जिवनाची द्यायला.
महाराज तुम्ही परत या,
राज्य रयतेचे परत द्याया.
महाराज तुम्ही परत या.
महाराज तुम्ही परत या.
महाराज तुम्ही परत या.
