STORYMIRROR

yuvaraj jagtap

Others

3  

yuvaraj jagtap

Others

महापूर

महापूर

1 min
173

काळ्या कुट्ट नभातून

धुंद बरसल्या धारा

नाच विजांचा अंबरी

धरेवर जल मारा


पुऱ्या महिन्याची वर्षा

कोसळली एक दिनी

अख्खे शिवार बुडाले

सर्वदूर पाणी पाणी


ओलांडली रे पातळी

गावं वेढली पुरात

पाणी शिरता घरात

भरे धडकी उरात


गेली वाहूनी रे शेती

गुरं ढोरं ही वाहिली

अख्या संसाराची माती

गत पुराने ही केली


झाले होत्याचे नव्हते

गेले पुरात वाहून

कळ अंतरात उठे

रुद्र पूर हा पाहून


वेग पाण्यास इतका

सारे क्षणात रे नेई

होई जीवनही शून्य

शुद्ध हरपून जाई



साहित्याला गुण द्या
लॉग इन