STORYMIRROR

Amrapali Ghadge

Others

4  

Amrapali Ghadge

Others

मैत्री

मैत्री

1 min
64

मैत्री असावी तर अशी

शुद्ध देशी तुपासारखी, 

मैत्रीतील रुची दिवसेंदिवस 

नेहमी वाढवत राहणारी.. 


मैत्री असावी तर अशी 

चोवीस कॅरेट सोन्यासारखी, 

कितीही जुनी झाली तरी 

नेहमी मौल्यवान असणारी 


मैत्री असावी तर अशी 

कुपीतल्या अत्तरासारखी 

आयुष्यभर सुंगधापरी 

नेहमी दरवळत राहणारी... 


मैत्री असावी अशी, 

स्वच्छ पाण्यासारखी 

तनास,मनास आरोग्यदायी 

नेहमी तंदुरुस्त ठेवणारी..


मैत्री असावी अशी 

नोबिता डोरेमॉन सारखी 

सुखदुःखात एकमेकांना

नेहमीच साथ देणारी...


मैत्री सदा जपावी हृदयातुनी 

ऋणानुबंध जन्मभराचे 

बंध असतात हे रेशमाचे 

असते अनमोल मैत्रीचे नाते 


Rate this content
Log in