STORYMIRROR

yuvaraj jagtap

Others

3  

yuvaraj jagtap

Others

मैत्री (हायकू)

मैत्री (हायकू)

1 min
392

मैत्री म्हणजे

मिलन ते मनाचे

सत्व नात्याचे


नाते मैत्रीचे

निखळ प्रेम झरा

मस्तीचा वारा


निस्वार्थ धागा

प्रतिक ते त्यागाचे

रक्त दुजाचे


दोर मैत्रीचा

सुता पेक्षाही मऊ

भासतो भाऊ


मैत्रीत नसे

जाती पातीचा गंध

नाते स्वच्छंद


मैत्रीत वसे

साथ सुख दुःखाची 

ओढ नात्याची


पूल मैत्रीचा

काळीज दोन जोडी

गुलाब गोडी


साहित्याला गुण द्या
लॉग इन