STORYMIRROR

Deepali Mathane

Others

4  

Deepali Mathane

Others

मायमाऊली

मायमाऊली

1 min
357

माय चुका घेई पदरात

पदरात जपे सुख-दुःख

तिच्याच अस्तित्वात उजळे

उजळे घर आमुचे लख्ख

   माय माऊलीचा सौख्य ठेवा

   ठेवा अंतरीच्या जाणीवेचा 

   पुरूनही उरे जन्मभर

    जन्मभर तीच्या उणीवेचा

लेकराच्या सुखासाठी झटे

झटे रात्रंदिन माय माझी

नंदादीपाची वात तेवत

तेवत रूप तिचे ते साजी

    त्यागाची ती मूर्तरूप दिसे

    दिसे प्रेम वात्सल्य स्वरूप

   नात्याची वीण अशी मोहक

    मोहक हास्य सगुणरूप

घरादाराचा आत्मा माऊली

माऊली वात्सल्याचे माहेर

नवमास जपूनी उदरी

उदरी दिला जीवा आहेर

   उपकार न फिटे या जन्मी

    जन्मी संस्कारांची मांदियाळी

    देवा सुखी ठेव तिला सदा

    सदा तिच्याने घडे दिवाळी....


साहित्याला गुण द्या
लॉग इन