मायबाप
मायबाप
मायबाप देवा सम किती वर्णावी महती किती कष्ट साहुनिया केले महान जगती 1
सदा चिंता लेकरांची मनी एकची तो ध्यास होवो मुले यशवंत हीच असे मनी आस 2
खत पाणी संस्काराचे देऊनिया केले मोठे घडविले भवितव्य कोठे न पडण्या खोटे 3
सारुनिया हौस मौज सदा घडविण्या दक्ष पुरविले हट्ट लाडगुणी बाळाकडे लक्ष 4
किती ऋण मजवरी कधी न व्हावा विसर फेडण्यास त्यांचे ऋण घडो सेवा निरंतर 5
नको करु कोणा देवा जगताती निराधार नसे मायबाप त्यांचा तूची असशी आधार 6
जया संगे मायबाप तेची खरे भाग्यवान गेल्या जन्माची पुण्याई होवो सारे पुण्यवान 7
