माय मराठी
माय मराठी
या मराठी भूमीचा
या मराठी भाषेचा
असे जिचा सार्थ अभिमान
अशी माझी माय मराठी
गाऊ तिचे किती गुणगान
थोर संत, थोर कवी जिथे घडले
मर्द मावळे जिथे लढले
अशा माझ्या माय मराठीचा
असे जिचा सार्थ अभिमान
अशी माझी माय मराठी
गाऊ तिचे किती गुणगान
जिजाऊ राणी लक्ष्मीबाई जिथे लढल्या
सावित्रीबाई फातिमा जिथे घडल्या
अशा माझ्या माय मराठीचा
असे जिचा सार्थ अभिमान
अशी माझी माय मराठी
गाऊ तिचे किती गुणगान
गड-किल्ले ज्यांनी बांधले
हिंदवी स्वराज्य ज्यांनी सांधले
अशा शिवबांच्या भूमीचा
असे जिचा सार्थ अभिमान
अशी माझी माय मराठी
गाऊ तिचे किती गुणगान
थोर संस्कृती साजिरी आपुली
मराठमोळी बोली आपुली
शृंगाराचा जिला मान
असे जिचा सार्थ अभिमान
अशी माझी माय मराठी
गाऊ तिचे किती गुणगान
पोवाडे गझल कविता अनेक गीत प्रकार
नृत्यांची विविधता जेथे हाती धरून हात
आपुल्याच संस्कृतीचा आपणास सार्थ अभिमान
अशी माझी माय मराठी
गाऊ तिचे किती गुणगान
गाऊ तिचे किती गुणगान
