माय मराठी
माय मराठी
1 min
242
जो कोणी बोलतो आपुल्या
मातृभाषेत
खेळतो वाटते आपल्या
आईच्या कुशीत
काॅन्व्हेंट च्या शाळेने केले
मराठीला हद्दपार
घरोघरी ही झाले
मराठीचे हाल फार
तोंड का होते वाकडे बोलताना
कपाळावर का पडते आठी
विसरु नका रे लेकरांनो
माय ती आपुली मराठी
