माय ममतेचा सागर
माय ममतेचा सागर
1 min
11.7K
जगी नाही तुलनाच ज्याची,
तो, माय ममतेचा सागर.
धरनीवरती देव रूपी,
करूया ममतेचा जागर.
आई ही पूजनीय जगात,
मायेची उब सहवासात.
जगावे मुक्तपणे जीवन,
आई रक्षा कवच साक्षात.
आई विना जीवन नाही,
माये शिवाय आहे का काही.
तिच्या वात्सल्याची ह्या जगात,
जगी कोठे तुलनाच नाही.
माय प्रेमाचा निखळ झरा,
कदर करावी तिची जरा.
उपकार नाही फिटणार,
हाच स्वर्गाचा मार्ग खरा.
