STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

मातापालक गीत

मातापालक गीत

1 min
11.6K

माता पालक संघ असावा 

मुलगी वाचवा, तिला शिकवा 

ध्येय असावे तिच्या रक्षणाला

एकत्र यारे तिच्या भविष्याला  


गुपित सारे समजून घ्यावे 

उगाचच रागावून गप्प न करावे 

मैत्रीण म्हणून नाते जोडावे 

तिच्या विचारांशी एकरूप व्हावे 


भीती मनातील तिची घालावी 

निर्भयपणे जगण्याची हिम्मत यावी 

परिनामांची जाणीव व्हावी 

नव्या युगाची पहाट फुलावी 


माता पालक उद्देश समजवा 

घरोघरी जागृतीचा संदेश पोहचवा 

स्री जगण्याला आधार मिळावा 

स्री समानतेचा मंत्र जपावा  


शारीरिक, मानसिक विकास साधावा 

शाळा शाळांतून संदेश पोहचवा 

पिढ्या पिढ्यांचा विचार असावा 

त्यात कधी खंड न पडावा


साहित्याला गुण द्या
लॉग इन