STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

3  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

माणूसपणाला थारा द्या

माणूसपणाला थारा द्या

1 min
11.6K

ह्य माणूसपणाला थारा द्या,

माणसाला माणूस बनवा.

काढून टाका ती जळमटे, 

ईतिहास नवा हा घडवा.

जाणीव संपली मनांतील,

रूंदी वाढली हृदयांतील.

माया, ममता मरली सर्व,

नजरा झाल्या सर्व कातील.

माणसातला माणूसपणा,

आहे ती एक दिव्य भावना.

फरक जनावरातला हा,

वेगळे करतो माणसांना.

माणूसकीला थारा देऊन,

व्रत माणूसकीचे घेऊन.

मशाल प्रेमाची पेटवून,

एक दुस-याला संभाळून.

माणूस बनुन दाखवू या,

थारा मानवतेला देऊ या.

ध्वज फडकवू या हा नवा,

वळण आता नवे घेऊ या.


Rate this content
Log in