माकड आणि मगर
माकड आणि मगर
1 min
219
नदीकिनारी झाड असती
त्यावर राही माकड
नदीच्या पाण्यात राही मगर
भुकेने होई त्याची तडफड
भुकेल्या मगराला पाहताच
खावयास आंबे दिले
दररोजच्या या भेटीने
मैत्रीचे बंध घट्ट झाले
काही आंबे घेऊनी गेले
खावयास आपल्या घरी
चव चाखताच आंब्यांची
हृदय खाण्याचा अट्टाहास करी
दुसऱ्या दिवशी मगर म्हणाले
जेवणाचे खास निमंत्रण तुजला
मगराच्या पाठीवर बसून गेले अन्
निमंत्रणाचे सत्य सांगती तयाला
सत्य ऐकताच केले नाटक
स्वतःचा जीव वाचविण्यासाठी
नदीकिनारी येताच म्हणाले
तू मैत्री केलीस स्वार्थासाठी
