माझ्याच धुंदीत मला...
माझ्याच धुंदीत मला...
1 min
530
माझ्याच धुंदीत मला
पालथंयाचे होते हे जग सारे
म्हणूनच ...
मीच दिले बळ मला
तोडण्या सारे हे बंधने !
माझ्याच धुंदीत मला
वावरायचे होते अस्त व्यस्त
म्हणूनच ...
मीच दिले बळ मला
माझ्याचसाठी नवं क्षितिजे तयार करण्यास !
माझ्याच धुंदीत मला
बागडायचे होते ज्ञानी बनण्यास
म्हणूनच ...
मीच दिले बळ मला
फुलपाखरू बनून ज्ञान कण वेचण्यास !
माझ्याच धुंदीत मला
फिर फिर फिरायचे होते
म्हणूनच ...
मीच दिले बळ मला
एका ज्ञानाकडून दुसऱ्या ज्ञानाकडे फिरण्यास !