STORYMIRROR

प्रियंका ढोमणे

Others

4  

प्रियंका ढोमणे

Others

माझ्या मराठीची गोडी

माझ्या मराठीची गोडी

1 min
619

माझ्या मराठी भाषेचा

आहे मला सन्मान

मी मराठी असल्याचा

मला वाटतो अभिमान


काय करता हो असे

हिंदी बोलुनी तुम्ही आता

माझ्या मराठीची गोडी 

घ्या अंगीकारूनी आता


ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी

उच्चारली माय मराठीने

माझ्या राजाची गाथा हो

पसरली माय मराठीने


किती गाऊ गाथा आता 

माझ्या माय मराठीची

शब्द कमी पडु लागले आता

गोडी गाऊनी मराठीची


भान ठेवुनी मनामधीं

मुखी लावा मराठीची ओवी

जरा जाऊन बघा की

माझ्या मराठीच्या गावी


Rate this content
Log in