STORYMIRROR

Shobha Wagle

Others

4  

Shobha Wagle

Others

माझ्या लेखी

माझ्या लेखी

1 min
177

लाडक्या माझ्या लेकी, प्राची वचना 

जन्म दिल्याने मी आहे त्यांची आई

पण आता मज भासे मीच त्यांचे

लेकरू आणि त्या माझ्या मोठ्या ताई.


नाते जरी अमुचे माय लेकीचे तरी

काळजी घेई माझी त्या आई परी

न बोलता जाणे भाव मनातले माझे

लेकी असल्या तरी नाते मैत्रिणीपरी.


भाग्यवती मी लेकी लाभल्या गुणवंती

मित्रत्वाचे नाते जुळले हे माय लेकीत

मग भिती कशाला बाळगू मी ह्या दुनियेत

असेच आपुलकिचे नाते असावे तिघीत.


संस्काराचे परंपरेचे नाते बिंबवले मुलीत

विश्वास पूर्ण,जोपासतील त्या अश्याच

परंपरा निर्भयतेने आणि दृढविश्वासाने 

स्वाभिमानी जीवन जगेल त्या तश्याच.


खोटे सोडुनी धरी सदा सत्याची कास

कर्तव्य निभावण्यास आहे सदैव तत्पर

परोपकरी वृत्ती अंगी तयांच्या असुनी 

भूतदया करती मुक्या पशू पक्ष्यावर.


देवा श्री गणेशा मागते मागणे एकच 

सुख,शांती व समाधानात ठेव लाडलींना

कसलीच कमतरता देऊ नको त्यांना

 तुझी कृपेची साऊली लाभोे माझ्या लेकींना.


Rate this content
Log in