माझ्या भिमाने कमाल केली
माझ्या भिमाने कमाल केली
माझ्या भिमाने कमाल केली,
धुरा धम्माची दुनियेत नेली.
जाती पातीच्या विदळातुन,
होडी प्रगतीची किनारी नेली.
माझ्या भिमाने कमाल केली.
माझ्या भिमाने कमाल केली.
रंजल्या गंजलेल्या समाजाला ह्या,
क्रांतीची हि नवी दिशा दिली.
माझ्या भिमाने कमाल केली.
माझ्या भिमाने कमाल केली.
गावरान अनाडी दुनियेच्या हातात,
शिक्षणाची हि मशाल दिली.
माझ्या भिमाने कमाल केली.
माझ्या भिमाने कमाल केली.
मोडलेल्या आपल्या समाजाला,
प्रगतीची, संघटनेची हि पंखे दिली.
माझ्या भिमाने कमाल केली.
माझ्या भिमाने कमाल केली.
राज्यकारभार चालवायला देशाचा,
त्यांनी, ही राजघटना दिली.
माझ्या भिमाने कमाल केली.
माझ्या भिमाने कमाल केली.
आज खातोय दोन हतानी जी,
ती, भाकरीही भिमानेच दिली.
माझ्या भिमाने कमाल केली.
माझ्या भिमाने कमाल केली.
