STORYMIRROR

Shubham Yerunkar

Others

3  

Shubham Yerunkar

Others

माझं कोकण...

माझं कोकण...

1 min
11.7K

दऱ्याखोऱ्यातून माझ्या कोकणाची वाट 

मला आस लावते माझ्या कोकणी भाषेची


फणसासारखे मधुर अापुल्या माणसाचे मन

दूर जाता कोकणासाठी भरलेले डोळे पाणावती


कोकणात माझ्या विस्तीर्ण सागर

मौज वाटे पाहाण्यास मासोळ्याचे सूर


लालबुंद या मातीत तांदूळ वरीचे पिके

कोकणचा हापूस आंबा अवघे जग जिंके


करवंद, जांभूळ, काजू अापुला कोकणी मेवा

निसर्गाने तर दिलाय जणू अनमोल ठेवा


साहित्याला गुण द्या
लॉग इन