माझी मराठी
माझी मराठी
कुसुमाग्रजांचा जन्मदिन माझ्या मराठीचा दिन
मुळ संस्कृतामधुनी निपजली तिला ज्ञानदेवानं
भावार्थ दिपिकेचे पठण सामान्य जन मुखातून
ज्ञानेश्वरी वाचून लोकांस मिळाले गीतेचे ज्ञान.
संताच्या वाङमयाचे भांडार माझ्या मराठीत
केशव सुत, मोरोपंत, बहिणाबाई मराठी काव्यांत
कानेटकर, खांडेकर, पु.ल. अशा श्रेष्ठ लेखकांनी
अफाट खजिना भरलाय मराठी साहित्यात.
देवनागरी लिपीत, काना मात्रांच्या शृंगाराने
सजलेली मायाळू माय माझी मराठी गं.
माझ्या शिक्षणाचा श्री ग णे शा मराठीने,
स्वर, व्यंजने व बाराखडीने उभारलाय गं.
माझ्या मराठीचा गोडवा वर्णावा किती बाई!
साध्या सोप्या अर्थाने देई विद्यार्जन सर्वांना.
देशाचे नामवंत लोक घडवले माझ्या मराठीने
आता नाही त्यांची आठवण आजच्या तरुणांना.
काय भुललास वरलिया रंगा, तसा भाळला इंग्रजीला.
ऐपत नाही तरी पोरा घाली इंग्रजी माध्यमात
इंग्रजीमुळे संदर्भ काही लागेना पोराला
शाळेहून जास्त वेळ पोराचा जाई शिकवणीत
मुलांची गळती भारी वाढलीय मराठी शाळांत
स्वतः नाही शिकला तरी पोरां घाली तो इंग्रजीत
पालकांनो कायम लक्षात असू द्या, तुमच्या
शिक्षणाचा पाया मजबूत होईल तो मराठीत.
साऱ्या महाराष्ट्राची भाषा माझी माय मराठी
वऱ्हाडी, कोकणी, मालवणी, अहिराणी,
पैलू बदलत असते ती प्रत्येक बारा मैली पण,
तिच्या गोडव्याला प्रतिस्पर्धी नाही दुजा कोणी!
राष्ट्रभाषेचा दर्जा मिळाला एकोणीसशे साठ साली
शिवबाची शान, संताची खाण, साहित्याचा मान
जगभरात किर्ती संपादली माझ्या माय मराठीने
घेतो शपथ, देईन तिला सर्व भाषात प्रथम स्थान.
