माझी लेखणी
माझी लेखणी
माझी लेखणी आहे देखणी
नातं तिचे जुळे शब्दांशी
मन भाव टिपते कागदावर
बंध जोडते वाचक माणसांशी.
अशीच होती एक लेखणी
बाळशास्त्री जांभेकरांची
6 जानेवारी 1832 साली
झाली पत्रकार दिन महाराष्ट्राची.
'दर्पण' वृत्तपत्राला सुरूवात केली
तोच दिन आज करतो साजरा
वृत्तपत्रे अनेक आता निघतात
पण दर्पण त्याकाळी एक गोजरा.
कथा ,कविता,कादंबरी , नाटक
लिहीत असते लेखणी विविधतेने
राग,लोभ,द्वेष मस्तर करते ती प्रगट
लेखक,कविच्या लेखणिच्या सौदर्यतेने.
पत्रकारांची तडफदार लेखणी सदा
प्रभावित करत असते वाचकांना
मुखपुष्ट आकर्षण असते बातमीचे
त्याचाच खप जास्त होतो वृत्तपत्रांना.
