STORYMIRROR

Shubham mohurle

Others

3  

Shubham mohurle

Others

माझी कविता  *न जमलेलं सूत्र*

माझी कविता  *न जमलेलं सूत्र*

1 min
15.2K


सुख स्वप्नांपरी खेळते;

मात्र टिकवता येत नाही,

काम तर मिळते;

ते सांभाळता येत नाही,

सर्वकाही भेटत असतांना;

धंदाच सापडत नाही,


सर्व सांडल्यावर काय करू;

याचा अंदाजच घेता येत नाही,

स्वप्नांच्या मोहरात उडून जाता येत;

मात्र स्वप्नांची पूर्तीच करता येत नाही,


बाबल्याचे आयुष्य पहावेसे वाटते;

पण पाहताच येत नाही,

असंच या जीवनाचं गणित;

कधी कुणाला सोडवताच येत नाही,


दुःखापरी सुखाचे;

सूत्र कुणालाचं जमलेलं नाही...


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन