माझी बाहुली
माझी बाहुली
1 min
394
बरं झालं बाप्पा
दिली एक सुकन्या
तिच्यामुळे कळली
मला ही दुनिया
बोबडे तिचे बोल
डोळे गोल गोल
कळत नाही मला
तिचे किती लाड करू
तुरू तुरी चाले
तिचे घरभर पैंजण बोले
शोभा आली माझ्या घरा
आनंद मिळवून दिला खरा
उठता बसता मारती मिठी
सदानकदा नाव तिचे मुखी
मुलगी जन्मे ज्याच्या घरा
असे मानव सर्वात सुखी.
