STORYMIRROR

आ. वि. कामिरे

Others

3  

आ. वि. कामिरे

Others

माझे मलाच काय समजत नाही

माझे मलाच काय समजत नाही

1 min
288


शांत राहूनही रहायचे किती शांत  

याचे गणित काय समजत नाही

आणि खरे बोलूनही उलट उत्तर कसे होते

हे माझे मलाच समजत नाही


येत नाही अभ्यास मला दुनियादारी

म्हणून लोकांचे बोलने का मी खायचे

नी त्यांच्या सुखाकरता रडायचे मीच नेहमी

याचा शोध काही लागला नाही

आणि या लोकांचे माझे मलाच समजत नाही.


कळत मला नाही 

हे या सृष्टीत श्रेष्ठ सर्व आहे तरी काय

कलावंतच्या कलेला इथे नाही मान

अन् विद्यार्थ्याला सदा सहन करावा लागतो अपमान

माझे काहीस आहे तसच

धड कलावंत म्हणून जगताही येत नाही व विद्यार्थी म्हणून मरताही येत नाही

खरच या लोकांची बुद्धी काय मला कळत नाही 

व यश म्हणजे नेमके काय ते 

माझे मलाच समजत नाही


दुरावलो होतो समाजापासून लहानपणीच

पण तरीही माहीत नव्हते हा समाज असेल एवढा नीच

धड गर्दीत चालूही देत नाही

अन् गर्दीपासून वेगळे झालेल्याला जगू ही देत नाही

आता थकलो मी या समाजाचे गाऊन पुरान 

स्वताचे ओळख म्हणजे नेमके काय?

हे माझे मलाच समजत नाही



 


Rate this content
Log in