STORYMIRROR

vaishali vartak

Others

2  

vaishali vartak

Others

माझे लेखन

माझे लेखन

1 min
193

करीते लिखाण मी नेमाने

मज मिळे आत्म समाधान

माझ्या मनीचे भाव उमटे

मानते मी शारदेचे वरदान


सहज घडते लिखाण 

जसा मिळता विषय

करुनिया विचार मंथन

घेते ध्यानी आधीच आशय


कधी लेखणी रंगवी शब्द

प्रबोधन वा जपण्या संस्कृती 

तर कधी महत्त्व आरोग्याचे

पण लिखाण ही झालीय प्रवृत्ती 


माझी कविता असे साधी

नसे तयात राजकारण

दावते कधी निसर्गाचे रुप

सुंदर कसे ठेवावे पर्यावरण


मन धाव घेई अध्यात्माकडे

दर्शन घडवी संतजनांचे

कधी रंगवी बालमने तर

रंगविते सुंदर चित्र फुलांचे


देते कविता संदेश जनमनाला

सलाम सदाची जवानांना

सांगते आत्म निर्भय बनण्या

कौतुकाची थाप देश सेवकांना


सदा बहरावी माझी कविता

करण्या सेवा माय मराठीची

पसरण्या ख्याती जगताती

हीच सदैव इच्छा वैशालीची


Rate this content
Log in