STORYMIRROR

अरविंद कुलकर्णी

Others

3  

अरविंद कुलकर्णी

Others

माझे गुरू

माझे गुरू

1 min
408

जन्मदात्री माझी आई

तूच असशी माझा गुरु

अनंत अपराध घडले हातून

तू पोटास घेतले धरु


ग म भ न शिकविले जयांनी

धरुन माझ्या हाता

गुरुजी चरणी तुमच्या ठेवितो

विनंम्र माझा माथा


हरीनामामध्ये रंगून गेलो

आता लागली नाव ही पैलतीरु

दिले दान आयुष्याचे मोठे

ऐसे यशवंत माझे गुरू


Rate this content
Log in