माझे बालपण
माझे बालपण
बालपणाच्या आठवणी मज उत्साह देती भारी
किती स्वछंदी निराग्रस होते ते माझे बालपण
चिऊ काऊना बोलावुनी आई भरवत होती भात
रम्य बालपणाची जतन केलीय मी साठवण.
दंगा-मस्ती, खोड्या-मस्करी धमाल सवंगड्यांची
आट्या पाट्या लगोरी विटू दांडुचे खेळ अनेक
आज ही आठवता रमून जाते त्या बालपणात
काळ सुखाचा मौज मजेचा गमंती त्या कित्येक!
एक गुरुजी अनेक वर्ग सांभाळती किती प्रेमाने
भाग्य नसे आजच्या मुलांना तसे गुरुजी लाभणे
आई बाबा आजी आजोबा प्रेमळ सौख्य किती
रात्री जेवल्या नंतर गोष्टी एकता ते निजणे.
मुलां मुली संगे भातुकलीचा खेळाते रंगणे
चिमणीच्या दातांनी ते एकमेका देऊन खाणे
चिंचा आवळे करवंदे बोरे झेलून घेत असे
आठवताच सारे आज बालपणात रमून जाणे.
शाळेच्या विविध स्पर्धात मिळवलेली बक्षिसे
आठवताच भासे गुरुजीचे पाठीवर थोपटणे
किती उत्साहाचे आनंदाचे क्षण होते बालपणाचे
काळ सुखाचा तो आता कधीच न सापडणे.
