STORYMIRROR

mahesh gelda

Others

3  

mahesh gelda

Others

माझा शेतकरी

माझा शेतकरी

1 min
364

कधी माळरानात तर

कधी डोंगरकपारीत राबतो

बेरवशी पावसावर विसावुन

आयुष्याचा जुगार खेळतो


पिकेल कि नाही

हा सवाल नंतर

आधी घाम पैसा

त्या मातीत ओततो


त्यातच दुष्काळ, गारपीट

बँकेचे घेतलेलं कर्ज

यांच्या धास्तीत जगतो

पोरांबाळांसाठी शेती करतो


पोराला उच्च शिक्षण

मुलीच धुमधडाक्यात लग्न

एवढंच छोटंस स्वप्न

तो शेतीतुन पाहतो


दुबार पेरणीचं संकट

शेतमालाला मिळणारा भाव

यामुळे त्याच्या सा-या

स्वप्नांचा चक्काचुर होतो


सरकारी कमकुवत धोरणं

तुटपुंजी रक्कम मिळणं

म्हणजे घायाळ शरीरावर

शासन जुलुम करतो


पोरांबाळांची हेळसांड पाहतो

चहुबाजुंनी हाहाकार होतो

तेव्हा आपल्या सर्वांची

पोटं भरणारा शेतकरी

या कृषिप्रधान देशातच

आत्महत्या करतो...!


Rate this content
Log in