STORYMIRROR

Rahul Shedge

Others

3  

Rahul Shedge

Others

लोकशाहीचा उद्धारकर्ता

लोकशाहीचा उद्धारकर्ता

1 min
212

डाॅ. बाबासाहेब आमचे आधार

बहुजनांचा त्यांनी केला हो उद्धार॥धृ॥ 


भारतीयांना असे  

त्यांचा हो अभिमान  

आपण महापुरूषांचा 

राखुया हो सन्मान॥१॥


सार्‍यांना संविधानाने 

मिळवून दिला अधिकार

लोकशाही गणराज्य 

घडवण्याचा केला निर्धार॥२॥


अभिव्यक्ती, स्वातंञ्याचा 

दिला हो विश्वास 

आपुलकीने बंधुता 

टिकवण्याचा ध्यास॥३॥


सार्‍या देशाला त्यांनी

केले प्रकाशमान

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा

संदेश गेले हो देऊन॥४॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन