लिहू आनंदे
लिहू आनंदे
1 min
133
लिहू आनंदे वादळे मनातील
सोडून देऊ लगेचच सारे
एकमेकांना माफ करूया
वाहूदे आपापसात प्रेमवारे....
झाली वादळे जरा घरादारात
मनातील उमटवते कागदावर
मन करते रिते आणि होते शांत
मात करते सुख आणि दुःखावर....
रात्री अपरात्री उठून लिहिते तेव्हा
डोळ्यातील आसवे आपसूक गळतात
जुने लिहिलेले सापडले परवा कपाटात
गतकाली आठवणीत मनमोती रमतात...
नको व्देश या जीवनी, या अंतरी
नको वाद विवाद कोणाशीच आता
प्रेमस्वरूप वात्सल्यरूपी बरसावे
आनंदाचे ,हर्षाचे गीत गाता,गाता....