STORYMIRROR

vaishali vartak

Others

2  

vaishali vartak

Others

लहानपण देगा देवा

लहानपण देगा देवा

1 min
143

वाटे रहावे सदा लहान

रम्य असते बालपण

इकडून तिकडे बागडावे

चिंतेची सदा बोळवण


खेळ खेळा दिनभराते

सारे मिळेची हातात

लाड होई येता जाता

नसे काळजी मनात


बालपण काळ सुखाचा

काळजी चिंता मोठ्यांना

लहान मात्र खेळण्यात मग्न

नसे कल्पना लहानांना


जशी पाखरे विहरती

न दिसे चिंता कशाची जया

तसे सदा विहरे बालक

नसे तमा कधी उद्याची तया


उगा घेतले भरपूर आशीष

मिळवण्या हे मोठेपण

दिनरात्र छळे जवाबदारी

वाटे, दे ना देवा परत बालपण.


......................


बालपण


मन निर्मल

रुप सोज्वळ

बालक देते

मत प्रांजल


लहानपण

नसे मी पण

सदाची वाटे

मोठे आपण


डाव खेळिता

मस्ती करिता

बाल मनात

नसेची चिंता


खेळ खेळता

जरा लागता

धावत येई

माय ममता


काळ सुखाचा

बालपणाचा

रम्यची भासे

तो आनंदाचा


रम्यची क्षण

ते विलक्षण

आठव येता

आनंदे मन


आईचा घास

तिचाच खास

आठव येता

मन उदास


दे ना रे देवा

करीन सेवा

आठवणींचा

देईन मेवा


Rate this content
Log in