लहान बहीण
लहान बहीण

1 min

119
गोष्ट सांगतो ऐका एका सानूलीची
माझ्या गोड लहान बहिणीची
गोरे गोरे गाल गुलाबतच फुललेले
हलकेसे केस ते सुंदर काळे कुरळे
पापण्यांची उघडझाप घारे डोळे
अन मला पाहताच होठ खुदकन हसायचे
बाळ माझं झालं मोठं शिकलं रुसायला फुगयला
तू जातो शाळेत म्हणे कोण नसतं खेळ खेळाया
जाता शाळेला दिसली बाहुली छान
तसेच डोळे केसांची बट आणि गोरी गोरी पान
आलो घरी तरी बाळ अजून रुसलेलं
पाहता बाहुली हसली कसली गोडूल
राहो ती सदा सुखी आणखी काय हवंय दादाला
अलगद पाणी आलं डोळ्यात जेव्हा निघाली ती सासरला
तुझं माझं नातं म्हणजे टॉम आणि जेरी
मी केक तू त्यावरील चेरी