लग्न विवाह
लग्न विवाह
युवक युवती प्रेमात पडती
लग्नाचा प्रस्ताव मांडती
दोन कुटुंबें एकत्र येऊनी
बोलणी करुनी लग्न लावती.
विधी,मंगलाष्टके यथासार होई
देणे घेणे घराणी समजून घेई
सप्तपदीच्या वचनाने लेक माहेरची
क्षणात पतीची अर्धागिनी होऊन जाई.
विवाह सोहळा आप्ताचा मेळावा
पंगती मागून पंगती सारख्या बसती
उखाण्याची लज्जत एकसे एक बाई
गठबंधनची गाठ करवलीच सोडती.
विवाहाने लेक झाली सासूरवाशीण
गृहप्रवेश करी गृहलक्ष्मी माहेर सोडून
माप उलटून घरात शिरता क्षणीच
भविष्यातल्या पती संसारात जाई रमून.
आईवडिलांचे व आप्तजनांच्या शुभेच्छा
घेऊनी करी सुरुवात ती नव्या संसाराची
तिच्याच हाती असतो दोन घरांचा मिलाप
लेक लाडकी तर सुन ही लाडकी नव्या घराची.
लग्न विवाह गठबंधनने मिलन होई दोन जिवांचे
सप्तपदी वचनाची पुर्ती निभावयाची दोघांनी
एकमेका समजून सांभाळावे एकमेकाला
सुखी दांपत्तिक जीवन जगावे एकमेकांनी.
