लेकरं भीमाची
लेकरं भीमाची
नाही झाला जो त्यांचा समाजात त्याच्या राहुन
हात पुसले त्या नेत्यांनी आपलं आपलं खावुन
दीन-दुबळ्याची कळ कुणाला,
दाबशी त्यांनाच जाणून-बुजून
दखल त्यांची कोण आता घेईल,
सुकले डोळे त्याची वाट पाहून
माझ्यातलाच मी पणा संपेना,
डोकावतो मान तो राहून राहून
पंख प्रगतीचे मी स्वतःच छाटले,
सर्व समजून जाणून-बुजून
शक्ती दिली एवढी माझ्या देवानं,
ओंजळ भरलेली गेली सांडून
जागे व्हा अाता तरी, ठेवा थोडे भान,
आपणच वाढवू शकतो आपला मान
जागे व्हा, वाढवा आपली प्रगतीची तहान,
विसरू नका मेहनत त्या भीमाची महान
बुद्ध, धम्म, संघ यांचे महत्त्व तू जाण,
विसरू नका आहोत आपण लेकरे त्या भीमाची महान
विसरू नका आहोत आपण लेकरे त्या भीमाची महान
