लेक लाडकी
लेक लाडकी
1 min
310
लेक माझी लाडकी
असे खुप गुणवान
कसा मांडू शब्दात
पोरी तुझे गुणगान ||१||
लेक असे इत्तराची कुपी
लेक असे मायेचा पाझर
आई-वडिलांच्या कुडीचा
असे लाडकी लेक आधार ||२||
येई घराला घरपण तुझ्या
खेळण्या-बागडण्याने
लेक असे मायेची काया
जपा अनमोल रत्नाला विश्वासाने ||३||